गोगावले यांचे जाधवांना निमंत्रण

गोगावले यांचे जाधवांना निमंत्रण

चिपळूण, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : नुकतच शिउबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे. माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं जात आहे. या सगळ्या वाटचालीत, संघर्षात माझा वैयक्तिक स्वार्थ काय आहे? मला अनेक विषयांवर तुम्हाला बोलायचं आहे, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना साद घातली होती. यासंदर्भात चिपळून येथे सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावर भास्कर जाधव यांनी विचार केला तर आम्ही त्यांचे स्वागत करू अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी दिली.

चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना लिहलेले भावनिक पत्र सर्वत्र चर्चेत आहे. या पत्रामधून जाधव यांची नाराजी स्पष्ट दिसून येत आहे. याप्रकरणी आमदार गोगावले यांना जाधवांच्या पत्रासंदर्भात विचारले असता भास्कर जाधव यांनी विचार केला तर आम्ही त्यांचे स्वागत करू असे अप्रत्यक्ष निमंत्रणचं गोगावले यांनी जाधवांना दिले आहे. एक चांगला माणूस त्याची तिकडं घुसमट होतं असेल त्याला शिंदे साहेब न्याय देऊ शकतात असे मत गोगावले यांनी व्यक्त केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version