सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार तटकरेंचा दावा

सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार तटकरेंचा दावा

रत्नागिरी, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : दिल्लीत महायुतीच्या जागावाटपाची महत्त्वपूर्ण बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांना माध्यमांना प्रश्न विचारला. त्यावर दिल्लीतील बैठक अत्यंत समन्वय आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. या निर्धारातून आमची चर्चा झाली. ८० ते ८५ टक्के जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. दोन दिवसांत पुन्हा एक बैठक होईल अस म्हणत त्यांनी महायुतीच्या पुढील बैठकीचे संकेत दिले.

तटकरे म्हणाले, मित्रपक्ष खोटं पसरवत आहेत. आमच्यात कुठेही वेगळी भूमिका नाही. मित्रपक्षांना विश्वासात घेतच चर्चा सुरू आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी जागांबाबत पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीबाबत जे काही पसरवलं जातं आहे. त्यामध्ये बिलकुल तथ्य नाही असे त्यांनी स्पष्य केले. सुप्रियाताईंची उमेदवारी जाहीर होणं ही औपचारिकता होती आणि या जागेवर निवडणूक लढवावी असं आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वांचं म्हणणं आहे. त्यामुळे महायुतीच्या जागांचं वाटप झाल्यानंतर ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर सुनेत्राताई पवार याचं आमच्या महायुतीच्या उमेदवार असतील असा अप्रत्यक्ष दावा तटकरे यांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version