पोषण आहाराच्या काळ्या बाजारात दोघांना अटक

पोषण आहाराच्या काळ्या बाजारात दोघांना अटक

नाशिक, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये राजगृह महिला बचत गट आणि छत्रपती शाहू महाराज महिला बचत गट यांच्या गोडाऊनमधून दिवसा दिवसा-ढवळ्या पोषणा आहाराच्या गोण्यातील ५० किलोच्या ७३ गोण्या काळ्या बाजारात वाहतूक करून घेऊन जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्याला मिळाली. या माहितीची कल्पना शासकीय अधिकाऱ्यांना देत कार्यकर्त्याने स्वत: जाऊन बाजारा समितीच्या आवारात गाडीत घेऊन जाणारा माल पकडला. मालेगाव कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांनी वाहन चालकासह दोघा व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

महिला बचत गटाच्या माध्यमातून होणाऱ्या काळ्या बाजाराबाबत ही गंभीर घटना समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने हा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनीही या घटनेची दखल घेत दोन वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version