लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन

लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन

पुणे, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील लोहगाव येथील नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत. दुपार बारा वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. मुंबई मेट्रो पाठोपाठ पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचेही उद्घाचन मोदींच्या हस्ते होणार आहे. केंद्र सरकारने लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलसाठी ५०० कोटी निधी दिला आहे. विमानतळातून सध्या रोज १८० विमानांची ये-जा होते पण आता नवीन टर्मिनलमुळे विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढणार आहे, अशी माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version