भाजपाच्या ६ प्रचार गाड्यांचे उद्घाटन

भाजपाच्या ६ प्रचार गाड्यांचे उद्घाटन

मुंबई, ९ मार्च, २०२४, प्रतिनिधी : लोकसभा २०२४ निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या प्रचारासाठी व्हिडिओ रथाचे उद्घाटन मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. वसंत स्मृती दादर कार्यालयाच्या बाहेर सहा व्हिडीओ रथाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी राज्यभर प्रचाराला आज पासून सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार तसेच विकसित भारत मोदींची गॅरंटी असे संदेश देत मोदींनी केलेल्या कार्याचे व्हिडिओ दाखवणारे रथ मुंबईभर फिरून प्रचार करणार आहेत.

या प्रचार रथांच्या माध्यमातून मुंबईतील सहाही लोकसभा क्षेत्रातील मुंबईकरांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांची माहिती पोहोचवली जाणार आहे. यावेळी आमदार प्रसाद लाड, महामंत्री संजय उपाध्याय, सर्व नगरसेवक, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version