ड्रग्ज प्रकरणात जफर सादिकला अटक

ड्रग्ज प्रकरणात जफर सादिकला अटक

चेन्नई, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : एनसीबी आणि दिल्ली पोलीस यांनी तामीळनाडूमध्ये संयुक्त कारवाई केली. या कारवाईद्वारे अब्जावधी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज व्यापाराशी संबंधित जफर सादिकला अटक करण्यात आली आहे.

जफर सादिक हा टॉलिवूड अर्थात तामीळ चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे, त्याचे सत्ताधारी द्रमुकशी लागेबांधे आहे. जफरने द्रमुकला मोठ्या प्रमाणात काळा पैसा पुरवल्याची चर्चा आहे. यामुळे जफर सादिकच्या अटकेने तामीळनाडूत उलथापालथीची शक्यता व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये अरबी समुद्रात ३३०० किलोचे ड्रग्ज पकडण्यात आले होते. या तस्करीशी जफर सादिकचा संबंध असल्याचे बोलले जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version