काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पहिली लोकसभा उमेदवार यादी जाहीर केली आहे. आचारसंहितेआधी ही उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने लोकसभेसाठी अवघे ३९ उमेदवार घोषित केले आहेत. वायनाडमधून राहुल गांधी यांची लोकसभा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.भूपेश बघेल यांना राजनांदगांवमधून उमेदवारी मिळाली आहे. तिरूअनंतपुरम येथून शशी थरूर यांना उमेदवारी मिळालेली पाहायला मिळत आहे. तर के.सी.वेणुगोपाल यांना अलप्पुझा येथून उमेदवारी मिळाली आहे.

विशेष म्हणजे वेणूगोपाल यांनी स्वत:च स्वत:च्या उमेदवारीची घोषणा करत आहेत. स्वत:च स्वत:चे नाव यादीमध्ये वाचताना पाहायला मिळणे हे नवलंच आहे. यावरून काँग्रेसला उमेदवार यादी जाहीर करताना दम लागल्याचे दृष्य दिसत आहे. याआधी भाजपाने त्यांची पहिली उमेदवारी जाहीर केली. यामध्ये त्यांनी १९५ उमेदवार जाहीर केले आहेत. आता काँग्रेसने अवघे ३९ उमेदवार जाहीर केले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version