‘पहिले महिला धोरण आम्ही जाहीर केले’

‘पहिले महिला धोरण आम्ही जाहीर केले’

पुणे, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी :  पुणे येथील जेजुरी येथे राशपचे सर्वेसर्वा शरद पवार दादासाहेब सोनवणे बॅडमिंटन कोर्टच्या उद्घाटन समारंभात उपस्थित होते. नुकतेच राज्य सरकारने महाराष्ट्रात चौथे महिला धोरण जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्घाटन समारंभात बोलताना शरद पवार यांनी देशातील पहिले महिला धोरण आमच्या काळात जाहीर केल्याचे वक्तव्य केले. या कार्यक्रमात त्यांनी भाषणातून लोकांना संबोधित केले.

पवारांच्या भाषणातील मुद्दे

देशातील पहिले महिला धोरण आम्ही नेहरू सेंटरमध्ये जाहीर केले – पवार
देशातील कर्तृत्ववान पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधीच नाव घेतलं जातं – पवार
महिलांच सक्षमीकरण करणं हे याच उद्दिष्ट होत- पवार
अगोदरच्या काळात बस स्थानकावर एक उसाच्या रसवाला असायचा मात्र हे बहुसंख्य पुरंदर तालुक्यातील असायचे – पवार
माझ्या काळात जनाई शिरसाईच पाणी देखील आणलं आणि याच माध्यमातून पुरंदरमधील अंजीर राज्याच्या बाहेर जाऊ लागली आहे हेच पुरंदरकरांचं यश आहे – पवार
एकेकाळी कारखाने फक्त मुंबईमध्ये असायचे आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी पिंपरी चिंचवड येथे एमआयडीसी चालू करण्याचा निर्णय घेतला – पवार
मी मुख्यमंत्री असताना एकाच ठिकाणी उद्योग न करता उद्योगाचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला – पवार
भिगवण, बारामती, जेजुरी या ठिकाणी एमआयडीसी उभा राहिल्या यातून हजारो रोजगार उपलब्ध झाले – पवार
ही गोष्टी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी पूरक नाही – पवार
राज्यात पाण्याची अडचण निर्माण झालेली आहे. यातील 40 टक्के जमीन ही बागायत आहे – पवार
सायरस पुनावाला यांनी घोड्याच्या रक्तातून एक वॅक्सिन तयार केलं. आज अनेक देशात त्यांचं वॅक्सिंन पोहचलं आहे – पवार
माझ्याकडे देशाचं कृषी खात असताना देशातील शेतकऱ्यांना शेततळी देण्याचा निर्णय माझ्या माध्यमातून घेण्यात आला – पवार
नागरिकांनी गुंतवणूक करण्याचं वातावरण इथं नेहमी ठेवलं यांचं मी अभिनंदन करतो – पवार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version