मोदींची गॅरंटी म्हणत चव्हाणांची मोदींवर टीका

मोदींची गॅरंटी म्हणत चव्हाणांची मोदींवर टीका

मुंबई, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींची गॅरंटी हा आचारसंहितेचा भंग असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. भाजपा पक्षाचा निवडणुक प्रचार आणि जाहिरात संबंधी आम्ही तक्रार करणार नाही. परंतु गॅस कंपनीकडून मोदीची गॅरंटी अशी जाहिरात करा असा आदेश देण्यात आला आहे. ह्याला आमचा विरोध आहे. सरकारी पैशांनी मोदी मोदी करू नका. आतापर्यंत या जाहिरातीसाठी झालेला खर्च वसुल करा कारण तो पैसा जनतेचा आहे असे वक्तव्य चव्हाणांनी केले आहे.

मोदींची गॅरंटी ही आचारसंहितेचा भंग करणारी जाहिरात आहे आणि या जाहिरातीसाठी जनतेचा पैसा वापरला जात आहे. तो खर्च पक्षाकडून वसुल केला पाहिजे असा आक्रमक पवित्रा चव्हाण यांनी घेतला आहे. ऐवढ्या दिवसापासून मोदीची गॅरंटी ही जाहिरात केली जात आहे. त्याला जनतेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करणारे वक्तव्य चव्हाणांनी केल असेल का?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version