मुंबई, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मकरंद मधुसूदन रानडे, शेखर मनोहर चन्ने, डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ दिली. मंत्रालयात राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी सोहळा पार पडला. मागील अनेक दिवसांपासून राज्य माहिती आयुक्तांची पदे रिक्त होती. अखेर ही पदे भरण्यात आली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.