मुंबई, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू आहे. भाजपा ही जागा लढवण्यास उत्सुक आहे. पण शिउबाठाच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात आमचाच उमेदवार उतरेल, अशी शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेचे यशवंत जाधव लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. तर भाजपाकडून दक्षिण मुंबईच्या जागेसाठी राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांची नावे चर्चेत आहेत.
मोदींच्या नावाच्या प्रभावामुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाची सरशी होईल, असा विश्वास व्यक्त करत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी ही जागा भाजपाला दक्षिण मुंबईची जागा मिळावी असा आग्रह धरला आहे. अरविंद सावंत यांच्या विरोधातील रोष फायद्याचा ठरू शकतो, असेही भाजपाचे म्हणणे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.