मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

मुंबई, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : गिरगाव येथे मुंबई महानगरपालिका आणि सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले. आज या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आवडीनुसार दिवस घालवता यावा आणि घरातील एकटेपणा दूर करण्यासाठी ह्क्काची जागा मिळावी या उद्देशाने केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

विरंगुळा केंद्रातील सोईसुविधा

ज्येष्ठ नागरिकांना घरात बसून कंटाळा आला तर तो दूर करण्यासाठी हे विरंगुळा केंद्र उभारले आहे. या केंद्रात बसून गप्पा तसेच आराम करण्यासाठी आराम खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत तसेच कॅरमसारख्या बैठ्या खेळांची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन मनोरंजनासाठी टिव्ही बसविण्यात आला आहे. या सर्व गोष्टी केंद्रात असणार आहेत.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version