नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नी विरोधात वॉरंट

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नी विरोधात वॉरंट

मुंबई, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी अडचणीत सापडली आहे. आलिया सिद्दीकी विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. हे वॉरंट अंधेरी न्यायालयाने काढले आहे. आलियाच्या मैत्रीणीने तिच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. आलिया सिद्दीकीने २०२२ मध्ये एका चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात आलिया सिद्दीकीच्या मैत्रीणीने ३१ लाख ६८ हजार रुपये गुंतवले होते. हे पैसे आलिया सिद्दीकीकडून परत मिळाले नाही, अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीआधारे अंधेरी न्यायालयाने आलिया सिद्दीकी विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version