रोहित पवारांची शेळकेंवर टीका

रोहित पवारांची शेळकेंवर टीका

पुणे, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : राशपचे खासदार रोहित पवार यांनी सुनील शेळकेंवर अहंकार चढला आहे तसेच भाजपप्रमाणे त्यांना खोटं बोलण्याची सवय लागली आहे अशी टीका केली आहे. शेळकेंकडून आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्याच्या तक्रारी आहेत. ते स्वत:च राष्ट्रवादीमध्ये असुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

रोहित पवार म्हणाले, अजित पवारांसोबत गेलेले बारा आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मराठवाड्यातील एका नेत्यांसोबत ते भाजपामध्ये जाणार आहेत.

अजित पवारांचे गुंड्यांना पाठबळ रोहित पवारांचे वक्तव्य

बारामतीत आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या आणि दमदाटी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. बारामतीमध्ये एक मलिंदा गँग आहे. त्याला गँगला अजित पवार यांचे पाठबळ असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर पूर्वी अजितदादा गुंड्यांना दूर ठेवत होते. भाजपसोबत गेल्यापासून त्यांचे फोटो गुंड्यासोबत येत आहेत. त्यामुळे अजितदादा बदलले आहेत असेही रोहित पवार म्हणाले. शरद पवार यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मावळ असो वा बारामती तिथली जनता हुशार आहे. मतदारसंघातील वातावरण वळसे पाटील स्वत: ऐवजी घरातील कुणीतरी उमेदवार देतील अशी शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version