टेलिव्हिजन शो छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करणारा करण कुंद्रा समाज माध्यमांद्वारे वारंवार विविध पोस्ट शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी करणने त्याचा विंटेज कारचा फोटो शेअर केला होता , जी त्याने नुकतीच खरेदी केली होती , पण ती आता गूढपणे गायब आहे . त्याने त्याचा इंस्टाग्राम व्हिडिओ स्टोरीद्वारे या झालेल्या घटनेबाबत तळमळ व्यक्त केली.
व्हिडिओमध्ये तो म्हणाला, ही चेष्टा करण्याची वेळ नाही. कार नवीन – जुनी कशीही असली तरी ती माझी कार आहे. आताच परवेज आला आणि मला सांगून गेला की, कार गायब आहे. माझी गाडी कुठे आहे,? कारमध्ये ट्रॅकिंग नाही किंवा सिक्योरिटी सिस्टिम सुध्दा नाही.
जर कोणी प्रँक करत असेल तर प्लिज असं करु नका, माझी कार मला परत द्या.”काल करण कुंद्रानं सोशल मीडियावर त्याच्या विंटेज कारचे फोटो शेअर केले होते. या फोटोला तिनं कॅप्शन दिले. करणने सोशल मीडियावर त्याच्या व्हिंटेज कारचे आणखी एक छायाचित्र पोस्ट केले, ज्यात ती मुन्नारमध्ये भेटल्याची आठवण करून दिली आणि नंतर ती एक प्रतिष्ठित एचएम कॉन्टेसा म्हणून ओळखली जाऊ लागली ,आता ही कार माझ्या गॅरेजमध्ये असणार आहे. या पोस्टने नेटिझन्सचे लक्षणीय लक्ष वेधून घेतले आणि त्यावर अनेकांनी लाईक आणि टिप्पण्या दिल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.