मविआचा जागावाटपाचा तिढा कायम

मविआचा जागावाटपाचा तिढा कायम

मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. हा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची पुढील बैठक शनिवार ९ मार्च २०२४ रोजी होणार आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागा लढवल्या त्या जागा लढवण्यास यावेळीही उत्सुक आहे. पण काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. सद्यस्थितीत महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे तर शिउबाठा आणि राशप यांची राजकीय ताकद कमी झाली आहे. यामुळे राज्यात सर्वाधिक जागा लढवण्यास काँग्रेस उत्सुक आहे. यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम आहे.

वंचित स्वतंत्र लढणार ?

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बुधवारच्या जागावाटपाच्या बैठकीला उपस्थित होते. पण बैठक संपण्याआधीच ते तिथून बाहेर पडले. जाताना ‘माझा चेहराच सगळं सांगतोय’ असे सूचक वक्तव्य करून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर निघून गेले. यामुळे वंचित बहुजन आघाडी लोकसभेची २०२४ ची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची चर्चा आहे. याआधी २०१९ मध्येही वंचित बहुजन आघाडीने लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. पण २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचितला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. आता यावेळी वंचित काय करणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मविआचा जागावाटपाचा तिढा कायम
मविआची पुढील बैठक ९ मार्चला होणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version