मोरेंच्या हटके वेशभूषेची चर्चा

मोरेंच्या हटके वेशभूषेची चर्चा

पुणे, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमामध्ये हटके वेशभूषेमुळे सर्वांचे लक्ष वेधू घेतले. ‘निवडणुका घ्या अथवा नका घेऊ, तात्याचा हातोडा पुण्यात चालणारचं’ अशा पोस्टरची वेशभूषा करत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी थेट हातोडा हातात घेऊन पुन्हा एकदा हटके अंदाजामध्ये या कार्यक्रमात प्रवेश केला आहे.

मोरेंच्या वेशभूषेची चर्चा

थेट हातोडा हातात घेऊन वसंत मोरे यांची एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात एंट्री केली आहे. यावेळी ‘निवडणुका घ्या अथवा नका घेऊ, तात्याचा हातोडा पुण्यात चालणारचं’ अशा आशयाच्या पोस्टरची वेशभुषा केली आहे. या कार्यक्रमातील त्यांचा लक्ष वेधून घेणारा हटके अंदाज चर्चेचा विषय झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version