न्यायाधीशदाचा राजीनामा, भाजपाच्या वाटेवर

न्यायाधीशदाचा राजीनामा, भाजपाच्या वाटेवर

कोलकाता, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी मंगळवारी राजीनामा दिला. एका पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले आणि ७ मार्चला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. लोकसभेची निवडणूक लढवणार की नाही आणि ती लढवली तर कोणत्या मतदारसंघातून लढवणार या प्रश्नाचे उत्तर योग्य वेळी देईन, असे ते म्हणाले.

कोण आहेत अभिजीत गंगोपाध्याय ?

अभिजीत गंगोपाध्याय यांनी २४ वर्ष वकीली केली होती. त्यानंतर २ मार्च २०१८ रोजी ते कोलकाता उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश झाले. २०२० मध्ये त्यांना बढती मिळाली आणि ते नियमीत न्यायाधीश झाले. ते या वर्षी ऑगस्ट महिन्यात निवृत्त होणार होते, पण आधीच गंगोपाध्याय यांनी राजीनामा दिला. भाजपाकडून तामकुल मतदारसंघातून गंगोपाध्याय निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version