पवार नाशिकमध्ये तुतारी फुंकणार

पवार नाशिकमध्ये तुतारी फुंकणार

नाशिक, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : राशपचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार शरद पवार नाशिक आणि आसपासच्या पट्ट्यात लोकसभा निवडणुकीसाठी सभा घेणार आहेत. पवारांची १३ मार्चला निफाड येथे सभा होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर पवारांची नजर आहे.

युगेंद्र पवार सुप्रिया सुळेंसाठी मैदानात

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष आहे. नणंद भावजय अशी लढत बारामतीत होण्याची शक्यता आहे… ही निवडणूक अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. या लक्षवेधी झालेल्या निवडणुकीसाठी युगेंद्र पवार यांनी पवार आजोबांना साथ देण्याचा आणि सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. युगेंद्र पवार हे मंगळवारी बारामती तालुक्यातील तेरा गावांचा दौरा करणार आहेत. ते नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version