जागावाटपावर काँग्रेसमध्ये चर्चा

जागावाटपावर काँग्रेसमध्ये चर्चा

मुंबई, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत लोकसभेसाठीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. काँग्रेस नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या नियोजनाबाबतही चर्चा केली.

मविआतील ताज्या स्थितीनुसार काँग्रेस हा आघाडीतला सर्वात मोठा पक्ष झाला आहे. यामुळे लोकसभेच्या राज्यातील ४८ पैकी जास्तीत जास्त जागा लाढवण्यास काँग्रेस उत्सुक आहे. याउलट पक्ष फुटीमुळे ताकद कमी झाली तरी शिउबाठा आणि राशप २०१९ मध्ये लढवलेल्या जागा सोडण्यास उत्सुक दिसत नाही. यामुळे मविआत जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version