अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा

अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा

छत्रपती संभाजीनगर, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात मराठवाड्यातून झाली. अमित शाह अकोला, अमरावतीसह सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाह यांच्या सभा आहेत. अमित शाह भाजपाच्या युवा संमेलनातून युवकांशी संवाद साधणार आहेत. प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून अमित शाह लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या नियोजनाची माहिती घेणार आहेत. तसेच अमित शाह राज्यातील जागा वाटपाच्या मुद्यावर भाजपाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version