‘मोदी का परिवार’ची समाजमाध्यमांत चर्चा

‘मोदी का परिवार’ची समाजमाध्यमांत चर्चा

नवी दिल्ली, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : ‘मोदी का परिवार’ची समाजमाध्यमांत चर्चा सुरू आहे. मोदी समर्थकांनी आपापल्या एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडलवर नावापुढे ‘मोदी का परिवार’ असे लिहिण्यास सुरुवात केली आहे. काही जणांनी देवनागरी लिपीत ‘मोदी का परिवार’ तर काही जणांनी ‘MODI KA PARIVAR’ असे इंग्रजी भाषेत, रोमन लिपीत लिहिले आहे.

काही राजकीय पक्षांमध्ये फक्त विशिष्ट नेते आणि त्यांच्या परिवारालाच महत्त्व दिले जाते. याउलट पंतप्रधान मोदी हे कायम देशाला सर्वोच्च प्राधान्य देतात. मोदींसाठी संपूर्ण देश हाच त्यांचा परिवार आहे. देशहिताला प्राधान्य देत ते काम करत आहेत. याच कारणामुळे अनेक मोदी समर्थकांनी एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडलवर नावापुढे ‘मोदी का परिवार’ असे लिहिण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने हा नवा प्रयोग सुरू केला आहे. याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधी यांनी मोदींवर चौकीदार चोर है अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना भाजपाने समाजमाध्यमांतून ‘मै भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version