गुजरातमध्ये राहुल येण्याआधीच काँग्रेसला धक्के

गुजरातमध्ये राहुल येण्याआधीच काँग्रेसला धक्के

गांधीनगर, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा गुजरातमध्ये पोहोचण्याआधीच काँग्रेस पक्षाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष अंबरीश डेर आणि गुजरात काँग्रेसचे आमदार अर्जुन मोधवाडिया या दोघांनी राजीनामा दिला. त्यांनी सर्व पदांचा राजीनामा देत काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. लवकरच अंबरीश डेर आणि अर्जुन मोधवाडिया भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अंबरीश डेर पक्षांतर करणार याचा अंदाज आल्याने काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांना सोमवारी सकाळी पक्षातून तडकाफडकी निलंबित केले. निलंबन झाल्यानंतर अंबरीश डेर यांनी राजीनामा देत काँग्रेससोबतचे नाते कायमचे तोडले. तर अर्जुन मोधवाडिया यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आणि पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजर राहण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा अर्जुन मोधवाडिया यांनी पत्र लिहून जाहीर निषेध केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version