प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना माढा मतदारसंघातून लढण्याची ऑफर दिली आहे. परंतु राष्ट्रीय समाज पक्षाची स्वतंत्र तयारी सुरू असल्याचे जानकर यांनी सांगितले.
महादेव जानकर माढा आणि परभणीसाठी आग्रही
राष्ट्रवादी समाज पक्ष अजूनही महायुती किंवा आघाडीत नाही. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लढण्याची ऑफर दिली त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु महायुती आणि आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही तसेच राष्ट्रीय समाज पक्षाची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे. परभणी आणि माढा मतदारसंघासाठी आम्ही आग्रही आहोत, असे जानकर यांनी म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांची राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यासाठी ते वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी चर्चा करत आहेत. महादेव जानकरसोबत आल्यास शरद पवार त्यांची जागा जानकरांना देणार असल्याचे म्हटले जात आहे. मविआचे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचे सूत्र अंतिम टप्प्यात आले आहे. सहा ते सात मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत हे सूत्र ठरेल अशी माहिती शरद पवार यांनी दिली. तर दुसरीकडे भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेआधी १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पण त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये ७८ खासदारांचा पत्ता कट करून त्यांना दणका दिली आहे. खासदारांना त्यांच्या खराब कामगिरीचे फळ मिळाले आहे. आता भाजपाच्या पुढील उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या उमेदवारांची नावे असतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.