चंदीगडमध्ये भाजपाची सरशी

चंदीगडमध्ये भाजपाची सरशी

चंदीगड, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : चंदीगडमध्ये भाजपाची सरशी झाली. चंदीगड महानगरपालिकेच्या वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर या दोन पदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला. कुलजीत संधू वरिष्ठ उपमहापौर आणि राजेंद्र शर्मा उपमहापौर झाले. वरिष्ठ उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या कुलजीत संधू यांना १९ तर आप – काँग्रेस आघाडीचा उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या गुरप्रीत सिंह गाबी यांना १६ मते मिळाली. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या राजेंद्र शर्मा यांना १९ तर आप – काँग्रेस आघाडीच्या उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या निर्मला देवी यांना १७ मते मिळाली.

चंदीगड महानगरपालिकेत भाजपाचे १४ नगरसेवक निवडून आले. नंतर आम आदमी पार्टीच्या तीन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे भाजपाच्या नगरसेवकांची संख्या १७ झाली. चंदीगड महानगरपालिका ही चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. यामुळे चंदीगडच्या लोकसभा खासदार किरण खेर यांनाही महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे. खासदार किरण खेर यांच्यामुळे भाजपाच्या मतांची संख्या १८ झाली. शिरोमणी अकाली दलाच्या नगरसेवकाने भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. यामुळे वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला १९ मते मिळवणे सहज शक्य झाले. याउलट आप – काँग्रेस आघाडीकडे फक्त १७ मते होती. वरिष्ठ उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत आप – काँग्रेस आघाडीचे एक मत बाद झाले. यामुळे त्यांच्या उमेदवाराला १७ ऐवजी १६ मते मिळाली. नंतर उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत आप – काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला १७ मते मिळाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version