कृपाशंकर सिंह जौनपूरमधून उमेदवार

कृपाशंकर सिंह जौनपूरमधून उमेदवार

नवी दिल्ली, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाने आचारसंहिता जाहीर होण्याआधी लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांच्या नावांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. या यादीत कृपाशंकर सिंह यांच्या नावाचा उमेदवार म्हणून समावेश करण्यात आला आहे. कृपाशंकर सिंह यांना जौनपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कृपाशंकर यांचा यादीत समावेश झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिंकून येण्याची क्षमता या निकषाआधारे कृपाशंकर यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version