‘भाजपाचे हिंदुत्व रोजगार देणारे’

‘भाजपाचे हिंदुत्व रोजगार देणारे’

मुंबई, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : उद्धवराव, भाजपाचे हिंदुत्व रोजगार देणारे हे पवारांनी पण मान्य केलं; या शब्दात भाजपाने उद्धव यांना टोला हाणला.

बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याद्वारे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या शरद पवारांनी नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहून पंतप्रधान मोदींच्या योजनांचे जाहीर समर्थन केले. या घडामोडींचा संदर्भ देत भाजपाने शिउबाठाच्या उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. भाजपाचे हिंदुत्व रोजगार देणारे आहे. ही बाब आता मविआच्या पवारांनीही मान्य केली आहे, असे भाजपाने सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version