जालना, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आलेल्या आंदोलनामागे काही समाजविघातक शक्ती आणि राजकीय व्यक्ती करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा संशय तीव्र करणारी माहिती, फोटो व्हायरल होत आहे. जरांगे यांचे आंदोलन चालवण्यासाठी ठराविक व्यक्तींकडून बेहिशेबी पैसा वापरला जात असल्याचा आरोप होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने इंटरनेट बंद केले असताना राजेश टोपे यांच्या साखर कारखान्याजवळच्या ग्रीडमधून सभास्थळी आणि अंतरवाली सराटी येथे विशेष केबल टाकून इंटरनेट पुरवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. उच्चवाहिनी, इंटरनेट केबल, कनेक्शन आणि जोडणीसाठी सुमारे वीस लाख रुपये खर्च करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे. हॉटेल हरी ओम, वडीगोद्री फाटा इथे आरक्षण समर्थकांच्या खाण्यापिण्याचे बिल ८७ लाखांच्या घरात गेले. हे बिल भरणाऱ्यांमुळेच सरकारचा संशय तीव्र झाला आहे. यामुळेच जरांगेंच्या मागून जोर कुणाचा ? आणि का ? हे जाणून घेण्यासाठी राज्य शासनाने जरांगेंच्या आंदोलनाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी ही विशेष तपास पथकाद्वारे होणार आहे.
वाळू तस्करी आणि जरांगेंचे आंदोलन
जरांगेंच्या आंदोलनात वावरणाऱ्या गाड्यांचा ताफा हा वाळू तस्करांनी पुरवला. आंदोलनासाठी वाळू तस्करांसाठी अफाट पैसा पुरवला. हॉटेलांची बिले भरण्यासाठी वाळू तस्करांनी पैसा दिला. जरांगेंवर जेसीबीतून फुले उधण्यासाठी होणाऱ्या खर्चाची जबाबदारी पण वाळू तस्करांनी घेतली होती. या तस्करांनीच फुले आणि जेसीबी पुरवले, अशी माहिती राज्य शासनाला मिळाली आहे. जरांगे समर्थकांच्या संपत्तीत आंदोलन काळातच अफाट वाढ झाल्याचे पुरावे आरोप करणाऱ्याने सरकारला सादर केले. मराठा आंदोलन सुरू होताच पोलिसांचा फौजफाटा आंदोलनस्थळी नियुक्त झाला आणि गोदावरीच्या खोऱ्यातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी सुरू झाली; असे आरोप होऊ लागले आहेत. या प्रकरणाचा खरेखोटेपणा तपासण्यासाठी राज्य शासनाने विशेष चौकशी पथकाची नियुक्ती केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.