महेश गायकवाडांची प्रकृती स्थिर, रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’

महेश गायकवाडांची प्रकृती स्थिर, रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’

मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तब्बल २४ दिवसांनंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली. तर गोळीबार प्रकरणात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच जण न्यायालयीन कोठडीत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी महेश गायकवाड ज्या भागात वास्तव्यास आहेत त्या परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version