मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : नॅक मूल्यांकन A + असणाऱ्या सायन येथील गुरु नानक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात कला उत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यंदाच्या कला उत्सव सोहळ्यासाठी परीक्षक म्हणून व्हॉइस ऑफ नाशिक विजेता असणारे अक्षय काळे आणि कोरियोग्राफर माधुरी पेडणेकर उपस्थित होते. दहा विद्यार्थी सूत्रसंचालक, २६ कार्यक्रम अर्थात परफॉर्मन्स आणि ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. परफॉर्मिंग आर्ट सर्कल टीमच्या आठ जणांनी कार्यक्रम अर्थात परफॉर्मन्सचे नियोजन केले.
कला उत्सव सोहळ्यात सोलो डान्स, सोलो सिंगिंग, ग्रुप डान्स आणि फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोलो डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहन कोरी , द्वितीय क्रमांक पूजा साहू आणि उत्तेजनार्थ क्रमांक निशा कोठारी यांना प्राप्त झाला तसेच सोलो सिंगिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहित गुप्ता, द्वितीय क्रमांक ओमकार कुलकर्णी व उत्तेजनार्थ क्रमांक पूजा पेंटा यांना मिळाला. ग्रुप डान्स स्पर्धेत शुभम अँड ग्रुप यांना प्रथम क्रमांक आणि ब्रिन्दा अँड ग्रुपला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले याचबरोबर फॅशन शो स्पर्धेत प्रथम क्रमांक जेंडर चॅम्पियंस, द्वितीय क्रमांक ज्योती अँड ग्रुप, उत्तेजनार्थ शोमायला अँड ग्रुप यांना प्राप्त झाला. परफॉर्मनींग आर्ट सर्कलचे अध्यक्ष संगम कोळी यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाविद्यलयाच्या प्राचार्या. पुष्पिंदर भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली कला उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.