मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडी आठवड्याभरात जागावाटप पूर्ण करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. जागावाटपाचे समीकरण निश्चित करण्यासाठी मविआतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या वारंवार बैठका सुरू आहेत. मविआतील घटक पक्षांचे प्रमुख नेते जागावाटपाच्या चर्चेत सहभागी झाले आहेत. काही जागांवर मतभेद आहेत. हा गुंता सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी बैठका घेऊन तोडगा काढण्यात गुंतले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.