बुलढाणा, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी शिउबाठाने प्रचार सुरू केला आहे. उद्धव जनसंवाद साधण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ते विदर्भातील बुलढाणा आणि मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत. याआधी उद्धव यांनी कल्याण, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या. उद्धव गुरुवारी चिखली, मोताळा, जळगाव जामोद येथे तर शुक्रवारी खामगाव, मेहकर, सेनगाव, कळमनुरी येथे सभा घेणार आहेत. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव तसेच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे बुलढाणा दौऱ्यात उद्धव शिवसेनेत प्रवेश केलेल्या लोकप्रतिनिधींना लक्ष्य करून बोलण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.