राज्यसभेची महाराष्ट्रातील निवडणूक बिनविरोध

राज्यसभेची महाराष्ट्रातील निवडणूक बिनविरोध

मुंबई, २० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यसभेची महाराष्ट्रातील निवडणूक बिनविरोध झाली. भाजपाचे तीन तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक असे महायुतीचे पाच उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला.

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाचे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पटेलांचीही बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारी अर्ज आले होते. यापैकी अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाला. यामुळे बाकीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवार २० फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने निकालाची औपचारिक घोषणा केली.

राज्यसभेची महाराष्ट्रातील निवडणूक बिनविरोध
महायुतीचे ५, काँग्रेसचा १ उमेदवार विजयी
भाजपाच्या अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडेंचा विजय
शिवसेनेच्या मिलिंद देवरा, राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांचा विजय
काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंचा विजय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version