चिपळूण दगडफेक राड्यातला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

चिपळूण दगडफेक राड्यातला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

प्रतिनिधी, चिपळूण, दि. २० फेब्रुवारी २०२४ : भाजपा आणि ठाकरे गटातील नेत्यांमुळे सध्या कोकणातील राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोरुन माजी खासदार निलेश राणे यांनी रॅली काढली होती. यावेळी राणे आणि भास्कर जाधव समर्थक शुक्रवारी सायंकाळी एकमेकांना भिडले. जोरदार घोषणाबाजी सुरू असताना, अचानक दगडफेक करण्यात आली. यामध्ये राणेंच्या गाडीची काच फुटली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुर आणि लाठीचार्जचा वापर करावा लागला. दरम्यान, या घटनेतील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

https://www.jaimaharashtranews.com/wp-content/uploads/2024/02/Chiplun-rada-video.mov

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version