चिपळूणमध्ये राडा, ४०० जणांविरोधात गुन्हा

चिपळूणमध्ये राडा, ४०० जणांविरोधात गुन्हा

चिपळूण, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कोकणात राजकीय शिमगा बघायला मिळाला. शिउबाठा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही बाजूने दगडफेक झाली. भाजपा नेते निलेश राणे यांची भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात सभा होती. या सभेच्या निमित्ताने ते चिपळूणमध्ये आले. यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये दगडफेक झाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळच्या रस्त्यावर झालेल्या राड्याप्रकरणी ४०० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पाच पोलिसांसह दोन्ही गटातील ४० कार्यकर्ते जखमी राड्यात जखमी झाले. या जखमींवर उपचार करण्यात आले आहेत. पोलिसांनी भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस बंदोबस्त असल्यामुळे चिपळूणमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version