मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मिलेनी यांनी लंडनमधील आर्टिफिशिअल इंटलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची इच्छा व्यक्त केली. मिलेनी यांच्या भूमिकेचे स्वागत करतानाच, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.