जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

जालना, १५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु आहे. सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसागणिक खालवत आहे. पण, बुधवारी जरांगे यांची तब्येत खालावली त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली, मात्र जरांगेनी सलाईन काढून टाकली. मागील सहा दिवसापासून त्यांनी अन्न,पाणी आणि उपचारही घेतले नसल्याने त्यांना बोलण्यासाठी त्रास होत आहे तसेच त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव देखील होत आहे.”जर सरकारने लवकरच आक्षरण नाहीं दिलं तर १८ किंवा १९ तारखेला मी एकटाच मुंबईला जाणार आणि या दरम्यान माझं काही बरं वाईट झालं किंवा मी मेलो तर मला गाडी टाकून मुंबईला पाठवून द्या” असे आवाहन जरांगे पाटीलांनी समाजाला केले आहे. जरांगेंच्या उपोषणस्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झालेत.

https://youtu.be/eFXhh_lVyIE

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version