उल्हासनगर, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच जणांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत पाटील यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींची पोलीस कोठडी संपली म्हणून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.