मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : आमदारकीचा आणि काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाणांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालायत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना अशोक चव्हाण यांनी आशिष शेलार यांच्याविषयी बोलताना चूक केली. मुंबई भाजपा अध्यक्ष असे म्हणण्याऐवजी अशोक चव्हाण चुकून मुंबई काँग्रेस अध्यक्ष असे म्हणाले. हे ऐकून पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्वजण हसले. । व्हिडीओ
नेमकं अशोक चव्हाण काय म्हणाले ?
‘राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष… ‘ असे अशोक चव्हाण म्हणाले आणि पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्वजण हसले. डणवीसांनी लगेच चव्हाणांना सांगितलं भाजप अध्यक्ष… यानंतर कार्यालयात उपस्थित पदाधिकारी, नेते मंडळी, पत्रकार सारेच खळखळून हसले. त्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, हा सवयीचा परिणाम आहे. भाजपाच्या कार्यालयात ही माझी पहिली पत्रकार परिषद आहे, त्यामुळे पहिलाच दिवस असल्याने तेवढं आज माफ करा. कालच राजीनामा दिला, त्यामुळे गडबड झाल्याचे त्यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.