पदाची अपेक्षा नाही – चव्हाण

पदाची अपेक्षा नाही – चव्हाण

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : आमदारकीचा आणि काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. ‘कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचं काम करणार. यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करणार. भाजपासाठी प्रामाणिकपणे काम करणार. आगामी निवडणुकीत भाजपाला जास्तीत जास्त जागा मिळाव्या यासाठी प्रयत्न करणार’; असे पक्षात प्रवेश करताना अशोक चव्हाण म्हणाले. फडणवीस माझ्या मतदारसंघातील विकासाच्या आड आले नाहीत, असे एका प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version