रालोद रालोआमध्ये सहभागी

रालोद रालोआमध्ये सहभागी

नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रीय लोक दल सोमवारी राष्ट्रीय राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाले. प्रादेशिक पक्ष ही ओळख मिरवणारा राष्ट्रीय लोक दल हा पक्ष जाट, शेतकरी आणि मुसलमानांचे प्रतिनिधित्व करतो. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये या पक्षाची ताकद आहे. या भागात लोकसभेच्या २७ जागा आहेत. याआधी २०१९ मध्ये भाजपाने पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये १९ जागा जिंकल्या होत्या तर समाजवादी आणि बसपाने प्रत्येकी चार जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रीय लोक दलाला लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत एकही जागा जिंकणे जमले नाही. पण या पक्षाकडे असलेले मताधिक्य आपल्यासोबत घेऊन भाजपा २०२४ च्या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना ९ फेब्रुवारी २०२४ रोजी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. ही घोषणा झाली त्यावेळी चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी यांना गहिवरून आले होते. भारतरत्न पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर जयंत चौधरी आणि त्यांच्या पक्षाची मोदी सरकारविषयीची भूमिका बघूनच राजकीय अभ्यासकांनी राष्ट्रीय लोक दल लवकरच राष्ट्रीय राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार अशी शक्यता व्यक्त केली होती. ही शक्यता सोमवारी प्रत्यक्षात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version