शिर्डीत भाजपाने केले ‘परिवर्तन’

शिर्डीत भाजपाने केले ‘परिवर्तन’

शिर्डी, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत विखे पिता-पुत्रांच्या दोन्ही पॅनलचा पराभव झाला. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विवेक कोल्हे पुरस्कृत परिवर्तन पॅनलने १७ – ० असा विजय मिळवला. विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने अनेक वर्षांपासून विखे गटाच्या ताब्यात असलेल्या सोसायटीची सत्ता खेचून आणली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपाचे विवेक कोल्हे यांनी एकत्र येत विखेंच्या ताब्यातून गणेश कारखाना खेचून आणला होता. त्यानंतर साई संस्थानच्या सोसायटी निवडणुकीत पुन्हा एकदा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांना धक्का बसला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version