राहुल विरोधात राज्यभरात भाजपाचं आंदोलन

राहुल विरोधात राज्यभरात भाजपाचं आंदोलन

मुंबई, ०९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टिप्पणी करून ओबीसींचा अपमान केला. त्यांचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रासह दक्षिण मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन होईल. तसेच राज्यभरात भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती भाजपा मुंबई अध्यक्ष. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राहुल गांधी यांनी केलेले विधान ओबीसी समाजाला हिनवणे टोमणे मारणे या अर्थाने होते. त्यावर ओबीसी समाजाची मंडळी कोर्टात गेली. त्यांनी दावा दाखल केला. त्यातील सर्व न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी यांना कोर्टाने सजा दिली. सर्व घटनात्मक संविधनात्मक प्रक्रिया झाल्यानंतर दोषी सिद्ध झाल्यावर शिक्षा झाली. लोकशाही प्रक्रियेनुसार शिक्षा झाली आहे. राहुल गांधी यांनी देशाची बदनामी भारताच्या भूमी बाहेर जाऊन केली आहे.

हे कदापि भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. त्यावर राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. ओबीसी समाजाच्या बदनामीचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. त्यांनी ओबीसी समाजाचीही माफी मागितली पाहिजे. त्यासाठीच राज्यभर आंदोलन होणार आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये जोरदार आंदोलन होणार आहे. सर्वसामान्यांच्या भावना तीव्र आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version