माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरवर गोळीबार

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरवर गोळीबार

दहिसर मुंबई, ०८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : शिउबाठा गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडलीय. अभिषेक घोसाळकर यांना पाच गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे. घोसाळकर हे शिउबाठा गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक आहेत. मॉरिसनेही स्वत:ला सुद्धा ४ गोळ्या मारुन घेतल्याची माहिती मिळत आहेत. दहिसरमध्ये गोळीबार झाल्याने मुंबईत खळबळ उडालीय.

अभिषेक घोसाळकर सह मॉरिस दोघेही ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शिउबाठा गटात असलेले विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. गोळीबार का केला? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मॉरिसभाई नाव्याच्या व्यक्तिने पैशाच्या वादातून अभिषेक घोसाळकर यांना ठार मारले आहे. घोसळकर यांना कार्यालयात बोलून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्यांच सांगितलं जात आहे.

दरम्यान मॉरिसनेही स्वत:ला सुद्धा ४ गोळ्या मारुन घेतल्याची माहिती मिळत आहेत. आपआपसातल्या वादातून गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, मॉरिस भाई नावाच्या कार्यालय आल फोडण्यात आले आहे. यापूर्वी उल्हासनगर येथे पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता, यामुळे महाराष्ट्रात चाललंय काय असा प्रश्न पडत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version