नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिले. यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शरद पवार गटाकडून आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. यापैकी ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असे नाव पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी हे नाव तात्पुरते देण्यात आले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी पक्ष चिन्हाची गरज नसते त्यामुळे पवारांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने अद्याप घेतलेला नाही. राज्यसभेची निवडणूक २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
राष्ट्रवादीत चंद्रोदय, राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार नावाने आता राजकारण
शरद पवारांची आजवरची निवडणूक चिन्हे
बैलजोडी – १९६७
गाय वासरू – १९७१
पंजा – १९७८
चरखा – १९८०
पंजा – १९८८
घड्याळ – १९९९
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.