दापोली, दि. १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रात राजकारणात सातत्याने घडामोडी सुरु असतात. त्यातच उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपने उबाठा गटाला मोठा धक्का दिला. तब्बल २५ वर्षे बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत असलेल्या आमदार सुर्यकांत दळवींनी उबाठा गटाला अलविदा केले. दळवींनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुर्यकांत दळवींनी भाजपात प्रवेश केला.
दळवी का नाराज ?
सूर्यकांत दळवी हे गेल्या २५ वर्षांपासून बाळासाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. आमदार म्हणून १९९० ते २०१४ या काळात दळवींचे वर्चस्व होते. पक्षातल्या लोकांनीच गद्दारी केली म्हणून २०१४ ला पराभव झाल्याचे वक्तव्यही दळवी यांनी केले. कदमांचा प्रभाव वाढल्याने शिंदे गटाऐवजी भाजपाची निवड केले असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना फुटल्यानंतर डावलल्याने दळवींचा अपेक्षाभंग झाला.
दापोलीतलं राजकारण
मतदारसंघांच्या पुर्नरचनेत नव्या खेड मतदारसंघात बहुतेक भाग दापोलीचा आहे. खेडचं वर्चस्व गेल्यानं कदमांची ढवळाढवळ वाढली. शिवसेनेची २०१९ला योगेश कदम यांना उमेदवारी दिली होती. उद्धव यांनी डावलल्याने दळवी नाराज झाले. शिवसेना २०२२ला फुटल्यानंतर महत्वाच्या जबाबदारीची दळवींना अपेक्षा होती. सूर्यकांत दळवींच्या अपेक्षेवर अनंत गीतेंनी पाणी फेरले. गीतेंना महत्वाचे पद दिले गेले त्यामुळे दळवी पुन्हा नाराज झाले. राजकारण संपण्यापेक्षा दळवींनी पर्याय शोधण्याचे ठरवले. दळवींसमोरचा पहिला पर्याय शिंदे गटाचा होता. मात्र शिंदे गटात पूर्वीपासूनच कदम पितापुत्र असल्याने त्यांनी तो पर्याय निवडला नाही. दळवींसमोरचा दुसरा पर्याय राष्ट्रवादी होता. मात्र राषटीरवाडी हा पक्ष कोकणात प्रभावहीन असल्याने त्यांनी हा पर्यायही बाजुला सारला. अखेरीस दळवींनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दळवींच्या मागे रवींद्र चव्हाणांची ताकद आहे. दळवींच्या आडून भाजपाची स्थानिक राजकारणात कुरघोडी सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.