अखिल भारतीय मांग समाजाकडून प्रभू श्रीरामचरणी चांदीचा झाडू भेट

अखिल भारतीय मांग समाजाकडून प्रभू श्रीरामचरणी चांदीचा झाडू भेट

२८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: अयोध्येमध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. लाखो भाविक अयोध्येत पोहचत असून आपापल्या ऐपतीप्रमाणे आणि श्रद्धेने दानही करत आहेत. शनिवारी दुपारपर्यंत भाविकांनी प्रभू श्रीरामाच्या चरणी साडे सात कोटींहून अधिक दान अर्पण केलं असून यात रोख रक्कम, सोनं – नाणं, चांदीची आभूषणे यांचाही समावेश आहे. यात शनिवारी आणखी एका वस्तूची भर पडली. मध्य प्रदेशमधील राष्ट्रीय हिंदू मातंग समाजानं राम मंदिरातील गर्भगृहाच्या साफसफाईसाठी चांदीचा झाडू भेट दिला. या झाडूचे वडन १ किलो ७५१ ग्राम असून याची किंमत जवळपास २ लाख रुपयांच्या जवळपास आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version