मोदी विरोधी आघाडी फुटली

मोदी विरोधी आघाडी फुटली

कोलकाता, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मोदी विरोधी आघाडी फुटली. तृणमूल काँग्रेस पक्षाने लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या या घोषणेमुळे मोदी विरोधी आघाडीला धक्का बसला आहे. याआधी राहुल गांधी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा बिहार आणि पश्चिम बंगालमधून जाणार असल्याचे जाहीर केले होते. ही घोषणा होऊन २४ तास होण्याआधीच तृणमूल काँग्रेसने लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version