मुंबई, २३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव गटाचे नेते रविंद्र वायकर यांची मंगळवार २३ जानेवारी रोजी ईडी चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी वायकरांना सकाळी अकरा वाजता मुंबईतीली ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. ईडीने वायकरांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे.
किशोरी पेडणेकरांना ईडीचे समन्स
उद्धव गटाच्या समर्थक असलेल्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने गुरुवार २५ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर होण्याचे समन्स बजावले आहे. चौकशीसाठी मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर व्हावे, अशा स्वरुपाचे हे समन्स आहे. शव पिशव्यांची खरेदी अर्थात बॉडी बॅगच्या खरेदीतील घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांना ईडीने चौकशीला हजर होण्याचे समन्स बजावले आहे. याआधी रोहित पवारांना बुधवार २४ जानेवारी रोजी चौकशीसाठी मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर होण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.