रोहित पवारांना ईडीचे समन्स

रोहित पवारांना ईडीचे समन्स

मुंबई, १९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांना बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. बुधवार २४ जानेवारी रोजी चौकशीसाठी मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर व्हावे, अशा स्वरुपाचे हे समन्स आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बारामती अ‍ॅग्रो कंपनीला प्रकल्प ७२ तासांत बंद करण्यास सांगितले होते. या विरोधात रोहित पवार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईला स्थगिती दिली होती. यानंतर काही दिवसांनी रोहित पवार यांच्याशी संबंधित सहा ठिकाणी ईडीने धाड टाकली. या कारवाईनंतर ईडीने रोहित पवार यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version